आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंचखेड शिवारात खून करून मृतदेह पुरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड- तालुक्यातील चिंचखेड येथे ३९ वर्षीय व्यक्तीस जिवे मारून शेतात पुरण्यात आले. १२ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० ते ११ वाजेदरम्यान ही घटना घडली होती. यात प्रथम अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासात हा खून असल्याचे उघड झाले आहे.

दत्ता बाबूराव पारवे (३९,चिंचखेड, ता. अंबड) असे मृताचे नाव आहे, तर सखाराम शेषराव वनारसे (२८), संदीप देवराव राजने (२१) व राहुल धोंडिबा नगरे (२२, तिघे रा. चिंचखेड, ता. अंबड) अशी आरोपींची नावे आहेत. दत्ता पारवे यांचा मृतदेह पिंपरखेड शिवारातील चिंचखेड गावात जाणाऱ्या रोडलगत वामन गायकवाड यांच्या शेतातील खड्ड्यात आढळला होता. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतर वरील तिघांनी दत्ता पारवेचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.