आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमध्ये कॉलेज परिसरातच प्रेयसीचा खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनीचा प्रेमप्रकरणातून चाकूने सपासप वार करून खून केला व स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजता पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात घडली.
नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माहिती तंत्रज्ञान विषयात तिसर्‍या वर्गात शिकणारी कोमल गोवर्धन कॅदरकुंटे ( 19 रा. लाइनगल्ली देगलूर) ही अप्लाइड मॅथेमॅटिक्स विषयाची परीक्षा देऊन मैत्रिणीसोबत परत जात होती. त्या वेळी प्रदीप अंबादास गंगावणे (22 रा. समतानगर मुखेड) याने कोमलवर चाकूने सपासप वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडताच प्रदीपने स्वत:वरही वार केले. ब्लेडने हाताची नस कापून तो कोमलच्या मृतदेहास कवटाळून तिथेच पडला होता. पोलिसांनी दोघांना शासकीय रुग्णालयात उपचासाठी दाखल केले. मात्र, कोमलचा जागेवरच मृत्यू झाला होता.
प्रदीपने हल्ला करण्यापूर्वी विषारी औषधही प्राशन केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप गंगावणेच्या बॅगमध्ये मिळालेल्या पत्रानुसार त्याचे व कोमलचे प्रेमसंबंध दोन वर्षांपासून होते. ही बाब आई-वडिलांना कळल्यामुळे कोमलने प्रदीपसोबतचे संबंध तोडून टाकले. त्यानंतर कोमलचे दुसर्‍या मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू झाले. ही बाब प्रदीपला कळताच त्याने तिला भेटण्याचा, बोलण्याचा अनेकदा प्रयत्न केला, परंतु कोमलने प्रतिसाद दिला नाही. प्रेमभंग झाल्याने मला आयुष्यात रस राहिला नाही. त्यामुळे मी तिला व स्वत:ला संपवणार आहे. आई-वडिलांनी मला माफ करावे मी त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही. असा उल्लेख पत्रात आहे. प्रदीपने एमजीएम कॉलेजमध्ये बीएस्सी पर्यंतचे शिक्षण घेऊन यशवंत महाविद्यालयात एमएस्सीसाठी रजिस्ट्रेशन केले होते.