आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी कुणी नसल्यामुळे केली ओली पार्टी; त्यानंतर पैशाच्या वादातून केला मित्राचा खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- नशेच्या आहारी गेलेल्या दोन मित्रांमध्ये पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. घरी कुणी नसल्यामुळे या दोघांनी ओली पार्टी केली होती. यावेळी एकाने आपल्या मित्राच्या पायावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात अतिरक्तस्त्राव झाल्याने मित्राचा जागीच मृत्यू झाला. ही घटना औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथे घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
 
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर श्रीराम भगवान पोले (60) हे त्यांच्या गावातील सुभाष उर्फ काळू लक्ष्मण जाधव (40) याच्या घरी गेले होते. सुभाषच्या घरी कुणी नसल्याने त्यांनी रविवारी रात्री ओली पार्टी केली. पार्टी झाल्यावर दोघांमध्ये पैशाच्या देण्या-घेण्यावरून रात्री 11 च्या सुमारास वाद झाला. सुभाष याने श्रीराम पोले यांना पैसे देण्याची मागणी केली. पैसे नाहीत, असे श्रीराम जोर जोरात ओरडत होते. त्यात सुभाष याने श्रीराम पोले याच्या दोन्ही पायावर लोखंडी रॉडने जोराने वार केले. यात दोन्ही पायाची हाडे चेंदामेंदा झाली आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. यानंतर आरोपी घटनास्थळाहून फरार झाला.
 
आज सकाळी मृत्यू झालेल्या सिद्धेश्वर यांचा भाऊ श्रीराम पोले यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपाअधिक्षक सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरु झाला. औंढ्याचे पीआय गणपत दराडे, एएसआय मोहन ढेरे, श्वान पथकाचे फौजदार ए.ए. रायमल आदी पोलिस अधिकारी, कर्मचारी आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. श्वास पथकातील मॅक्स नावाच्या श्वानाने घटनास्थळापासून आरोपीचा माग सिद्धेश्वरपासून जवळच असलेल्या गंगालवाडी येथपर्यंत काढला आणि आरोपीला अचूकपणे पकडूनही दिले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...