आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेंडा लावण्याच्या वादावादीतून जालन्यात एकाचा तलवारीने खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - झेंडा लावण्याच्या कारणावरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना जालना शहरातील द्वारकानगर भागात बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली.
येथील काही युवकांनी द्वारकानगर भागात झेंडे लावले होते. त्यातील झेंडा काढल्यामुळे त्यांचा शेख वसीम शेख नसीर आणि शेख अतिफ शेख याकूब यांच्याशी वाद झाला. यात तलवारीने वार केल्याने शेख वसीम शेख नसीर (18, द्वारकानगर, नवा मोंढा, जालना) याचा जागेवरच मृत्यू झाला, तर शेख अतिफ शेख याकूब हा गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती कळल्यानंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा पथकाच्या अधिकार्‍यांनी दोन मुख्य संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.