आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोदगा येथे खून; मृत बापूचे आरोपीच्या आईसोबत होते अनैतिक संबध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- औसा तालुक्यातील लोदगा येथे अनैतिक संबंधातून एकाचा खून करण्यात आला. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरा औसा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापू बळीराम मसे (४७, रा. भंडारवाडी, ता. उस्मानाबाद ) असे मृताचे तर विकास दिलीप शिंदे (रा. लोदगा, ता. औसा ) आरोपीचे नाव आहे. मृत आरोपी लोदगा येथील एका हॉटेलात कामाला होते.

मृत बापूचे आरोपी विकासच्या आईसोबत अनैतिक संबध होते. त्यातून विकासने खून केला. त्यातून विकासने बापूचा दगडाने ठेचून खून केला आणि मृताची ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप केला. त्यानंतर मृतदेह लोदगा शिवारात फेकून दिला. बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मृतदेह नागरिकांच्या निर्दशनास आला. त्यानंतर अवघ्या दोन तासांत पोलिसांनी मृताची ओळख पटवून आरोपीलाही ताब्यात घेतले आहे.
बातम्या आणखी आहेत...