आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून करून मृतदेह दगडाला बांधून विहिरीत टाकला, उस्मानाबादमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेड - उस्मानाबाद तालुक्यातील खेड शिवारात एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून करून त्याचा मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि.२१) सकाळी उघडकीला आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी प्रथम सदरील व्यक्ती कोण याची माहिती काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  
 
खेड शिवारात शेतकरी अंकुश भागवत चव्हाण यांच्या शेतात सामाईक विहीर आहे. सदरील विहिरीत सोमवारी (दि.२१) सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कमरेला दगड बांधून फेकला असल्याचे आढळून आले. याबाबत ढोकी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक किशोर मानभाव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह विहिरीबाहेर काढला.
 
सदरील व्यक्ती अंदाजे ४५ वर्षे वयोगटातील असून अंगावर असलेल्या जखमा पाहता प्रथम धारदार शस्त्राने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह दगड बांधून किमान अाठवडाभरापूर्वी विहिरीत टाकल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...