आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणीसाठी ११ वर्षीय मुलाचा परळीजवळ खून, पोलिसांनी केली एका आरोपीस अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- लातूरयेथील अकरा वर्षांच्या शाळकरी मुलाचे खंडणीसाठी अपहरण करून परळी तालुक्यातील कन्हेरवाडी शिवारात त्याचा खून करण्यात अाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. खून करणाऱ्यांपैकी दोघे अल्पवयीन आहेत.

लातूरच्या संभाजीनगरमधील अमित प्रकाश पदकोंडे (११) या मुलाचे गुरुवारी सकाळी अपहरण करण्यात झाले होते. दुपारी लातूर येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. याच भागातील विराट देशमुख (रा. संभाजीनगर, लातूर) इतर दाेन अल्पवयीन मुलांनी अमितचे गुरुवारी दुपारी एक वाजता दुचाकीवरून अपहरण केले हाेते. परळी तालुक्यातील कन्हेरवाडी शिवारातील वनात मारुती डोंगरावर दगडाने ठेचून अमितचा खून करण्यात आला. या प्रकरणी मुलाचे वडील प्रकाश पदकोंडे यांनी लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तिन्ही अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे. परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

परतजाताना पकडले
अमितचाखून करून तिघे लातूरकडे जात असताना लातूर पोलिसांनी त्यांना पकडले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनास्थळही दाखवले. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या तिघांनी अमितचा मृतदेह खड्ड्यात टाकून त्यावर दगड टाकले होते.

अमित प्रकाश पदकोंडे खून प्रकरणातील एक आरोपी विराट देशमुख (१९) यास शुक्रवारी खाडगाव रोड परिसरातून लातूर एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विराट अन्य आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्यांनी अमितचा कोणत्या कारणासाठी खून केला, याचा तपास पोलिस करीत आहेत.

अमितचेवडील मिस्त्री
मृतअमित याचे वडील निलंगा तालुक्यातील हनुमंतवाडीचे रहिवासी असून ते बांधकाम करतात, तर त्यांची पत्नी मजुरी करते. दहा वर्षांपूर्वी पदकोंडे दांपत्य उदरनिर्वाहाच्या शोधात लातुरात आले होते.

मोटारसायकल जप्त
यागुन्ह्यात आरोपींनी वापरलेली मोटारसायकल (एमएच २४ एक्स २५) ही खाडगाव भागातील सूरज खैरमोडे याची असून तो मच्छी व्यावसायिक आहे. या प्रकरणातील एक आरोपी सूरजचा तो शेजारी असून बाहेर जायचे आहे म्हणून त्याने सूरजकडून मोटारसायकल नेली होती, असे सूरजने सांगितले. पोलिसांनी ती मोटारसायकल जप्त केली आहे.