आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्ध पत्नीचा खून करून पतीने घेतला गळफास; आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- वृद्ध पत्नीचा गळफासाने खून करून पतीने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी सकाळी लातूरजवळील आर्वी येथे घडली. या घटनेचे कारण स्पष्ट झाले नसले तरी आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हरिश्चंद्र संग्राम आकनगिरे (७५) आणि कालिंदाबाई हरिश्चंद्र आकनगिरे (६५) अशी मृतांची नावे आहेत. आकनगिरे कुटुंबीय मूळचे रेणापूर येथील असून काही वर्षांपूर्वी ते आर्वी येथे स्थायिक झाले होते.  मृत हरिश्चंद्र यांचा मुलगा धर्मपाल हे आर्वीचे माजी सरपंच असून सध्या ते ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत.  अत्यंत आनंदी कुटुंब म्हणून आकनगिरे कुटुंबीयांची ओळख आहे.  

मंगळवारी हनुमान जयंती असल्याने धर्मपाल हे  पत्नीसह मुलांना घेऊन गुलाल उधळण्यासाठी मारुती मंदिरात गेले होते. तत्पूर्वी रात्री त्यांचे आपल्या आई- वडिलांशी बोलणे झाले होते. धर्मपाल हे मंदिरातून परतल्यानंतर त्यांना आई-वडील मृत अवस्थेत दिसले. हरिश्चंद्र यांनी घराच्या छताला फाशी घेतली होती, तर कालिंदाबाईंच्या गळ्यालाही फास आवळल्याचे दिसत होते. त्यानंतर धर्मपाल यांनी पोलिसांना कळवले. 

आजारपणामुळे आत्महत्या?  
कालिंदाबाई यांना कॅन्सर, टीबी, तर हरिश्चंद्र यांना मधुमेह व अन्य वृद्धापकाळातील आजार जडले होते. त्यानुसार दोघांवरही डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत होते. दररोज ते गोळ्या, औषधीही घेत होते. 
बातम्या आणखी आहेत...