आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाढ झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात पाटा घालून हत्या, खूनी पती पोलिसांच्या ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी- साखरझोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात पाटा घालून पतीने तिची निर्घृण हत्या केली. ही  घटना  शनिवारी पहाटे  आष्टी शहरात घडली.  पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. मनीषा संतोष कदम (३४) असे मृत विवाहितेचे नाव असून खुनामागचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. पती संतोष कदम याची कसून चौकशी सुरू आहे. 
 
शुक्रवारी रात्री कदम कुटुंबीयांनी एकत्रित जेवण केले. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. पहाटे अडीच वाजता पत्नी झोपेत असताना संतोष कदम याने दगडी पाट्याने तिच्या डोक्यात चार घाव घातले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी संतोष कदमला अटक केली आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपी संतोषला मेंदूचा आजार असून यातून त्याने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

आईच्या मृतदेहाशेजारी मुलगी रडत बसली
आई शेजारी झोपलेल्या १२ वर्षांच्या मुलीला जाग आली. तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा संतोषने तिलाही दम दिला. त्यानंतर तो घराबाहेर निघून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाशेजारी मुलगी अश्रू ढाळत बसली होती. तिने शेजाऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर आष्टी पोलिस तेथे पोहोचले.
बातम्या आणखी आहेत...