आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनाचा बदला खुनानेच; भररस्त्यात शिर धडावेगळे केले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी - तेरा वर्षांपूर्वी वडिलांचा खून करून शिक्षा भोगलेल्या मारेकर्‍याचा भर रस्त्यात खून करत मुलाने बापाच्या खुनाचा बदला घेतल्याची घटना तालुक्यातील खळवट निमगाव येथे बुधवारी रात्री घडली. आरोपीने शिर धडावेगळे केल्याने गावात दहशत होती.
खळवट निमगावमध्ये मदन चौधरी याच्या गुंडगिरीला कंटाळून 22 डिसेंबर 2000 रोजी रात्री भररस्त्यात दहा जणांनी त्याचा खून केला. सीताराम निर्मळ यांचे नाव आरोपींच्या पुरवणी यादीत न्यायालयासमोर आले. माजलगाव सत्र न्यायालयाने सन 2001 मध्ये दोषी ठरवून निर्मळ यांना सात वर्षे जन्मठेप सुनावली. या निकालावरून शिक्षा भोगत असतानाच निर्मळ यांनी औरंगाबाद खंडपीठात या निर्णयाला आव्हान दिले. खंडपीठाने सन 2005 मध्ये सबळ पुराव्याअभावी निर्मळ यांची निदरेष मुक्तता केली होती. तेव्हापासून ते गावी खळवट निमगावला आले. बापाचा खून करणारा मारेकरी न्यायालयातून निदरेष सुटला आणि पुन्हा उजळ माथ्याने गावात वावरत असल्याचा सल उमेश मदन चौधरी याच्या मनात होता. त्यामुळे त्याने निर्मळ यांचा खून करून बापाच्या मारेकर्‍याचा बदला घेतला. या प्रकरणी वडवणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
धारदार शस्त्राने सपासप वार
बुधवारी रात्री उमेश चौधरीने सीताराम निर्मळ (45) यांना गावातच गाठले. रस्त्यातच हल्ला चढवला. धारदार शस्त्राने डोक्यावर, मानेवर, चेहर्‍यावर वार करून जागीच ठार केले. एवढेच नाही तर शिर धडापासून वेगळे केले. पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी आरोपीला पकडले. आरोपी उमेश चौधरी याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.