आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस पडावा म्हणून मुस्लिम बांधवांकडून लातुरात नमाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसासाठी लातुरातील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा करताना मुस्लिम बांधव. साकडे - Divya Marathi
पावसासाठी लातुरातील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा करताना मुस्लिम बांधव. साकडे
लातूर- रुसलेल्यावरुणराजाला बोलावण्यासाठी सगळीकडे देवाचा धावा केला जात असताना रविवारी लातुरात मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून पावसासाठी विशेष नमाज अदा केली. या विशेष प्रार्थनेसाठी हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले होते.
पावसाने पुरती पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाअभावी उगवलेली पिके सुकून गेली आहेत, तर जिल्ह्यातील निम्म्या रानावर पेरणीही झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह संपूर्ण जनताच हवालदिल झाली आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिण्याच्या पाण्याची समस्याही भेडसावत आहे. पावसाची कृपादृष्टी होण्यासाठी परमेश्वराकडे सर्व स्तरांतून प्रार्थना केली जात आहे. त्यानुसार मुस्लिम बांधवांनी बार्शी रोडवरील ईदगाह मैदानावर विशेष ‘नमाज-ए-इस्तेस्का’ चे पठण करून पावसासाठी अल्लाहकडे साकडे घातले. या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी देवाने मदत करावी, पाऊस पाडावा, अशी प्रार्थना नमाजपठणादरम्यान ‘अल्लाह’कडे एकरूप होऊन हजारो मुस्लिम बांधवांनी केली. या वेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रूही दाटून आले होते. पाऊस होऊ दे, समस्त मानवजातीची भरभराट होऊ दे, सुख-शांती नांदू दे, अशी प्रार्थना करण्यात आली.

मौलानांनादाटले अश्रू
धर्मगुरूअलहज मौलाना जब्बार हाफिज साहेब अल्लाहकडे दुआ मागताना म्हणाले, पावसाअभावी अख्खी सजीवसृष्टी व्याकूळ झाली आहे. माणसाबरोबरच पशू-पक्ष्यांचे बेहाल होत आहेत. त्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हे ईश्वरा, आमच्या हातून काही चुका झाल्या असतील, अजाणतेपणे काही गुन्हा झाला असेल तर आम्हाला माफ कर...पण आमच्यावर असा नाराज होऊ नकोस. पृथ्वीतलावरील सगळी माणसे आम्ही तुझी लेकरे आहोत. त्यामुळे आमच्यावर कृपादृष्टी दाखव आणि दिलखुलास बरसात कर... ही दुआ मागत असताना मौलानांचे डाेळे पाणावले होते.

मजलिस-ए-उलेमाचा पुढाकार
पाऊसपडावा म्हणून अल्लाहकडे प्रार्थना करण्यासाठी मजलिस-ए-उलेमाच्या वतीने ‘नमाज-ए- इस्तेस्का’चे आयोजन करण्यात आले होते. येथील ईदगाह मैदानावर दुपारी तीन वाजता नमाज झाल्यानंतर दुवा करण्यात आली. नमाज आणि दुवा अलहज मौलाना जब्बार हाफिज साहेब यांनी केली. ईदगाह मैदनावर रमजान आणि बकरी ईदलाच वर्षातून फक्त दोनदाच नमाज अदा केली जाते. आजच्या विशेष प्रार्थनेमुळे यंदा ितसऱ्यांदा ही सामुदायिक नमाज पठण करण्यात आली.

सत्कर्म करा
मौलानाजब्बार हाफिज साहेब यांनी या वेळी आपल्या अनुयायांना सत्कर्म करण्याचा उपदेश दिला. ते म्हणाले, आपल्या हातून काही अघटित घडले असेल तर त्याची अल्लाहकडे माफी मागा. गरजूंना मदत करा. गांजलेल्यांची सेवा करा. दानधर्म करा. यातूनच पुण्याचा मार्ग सापडतो.
बातम्या आणखी आहेत...