आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज मुस्लिम समाजाचा लातूरमध्ये मूकमोर्चा ‘गंजगोलाई ते ईदगाह मैदानात जनसागर’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - मराठा आणि बहुजन मोर्चानंतर बुधवारी लातूरमध्ये मुस्लिम समाजाचा मूकमोर्चा निघणार आहे. गंजगोलाई ते ईदगाह मैदान अशा निघणाऱ्या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतूकही वळवण्यात येणार आहे.

लातूरमध्ये यापूर्वी निघालेले दोन्ही मोर्चे शांततेत पार पडले आहेत. तिसरा मोर्चाही शांततेत होणार असल्याची ग्वाही संयोजकांनी दिली आहे. मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. पोलिसांनी बार्शी रोड, औसा रोडकडून येणारी वाहतूक वळवली आहे. कोणतेही अवजड वाहन शहरात येणार नाही. तसेच मोर्चासाठी येणाऱ्या लहान वाहनांनाही मध्यवर्ती ठिकाणी प्रवेश देण्यात येणार नाही. शहराबाहेर वाहने लावून चालत यावे लागणार आहे. मोर्चासाठी जिल्ह्यातून कुमक मागवण्यात आली असून मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामध्ये स्वत: पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, ५ उपाधीक्षक, १५ निरीक्षक, ४४ उपनिरीक्षक, ५३५ कर्मचारी, ३ आरसीपी प्लाटून, १० तत्काळ प्रतिसाद दलाच्या तुकड्या, तसेच राखीव पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. मोर्चाच्या समारोपानंतर ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. दरम्यान, या मोर्चाला मराठा क्रांती मूक मोर्चाच्या संयोजन समितीने पाठिंबा दर्शवला असून जागोजागी पाणी, अल्पोपाहाराची सोय करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
बातम्या आणखी आहेत...