आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत मुस्लिमांचा एल्गार; देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, आता आम्हीच परके झालो का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- मुसलमानांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, इंग्रजाच्या विरोधात लढताना रक्त सांडले. देशातील अनेक पराक्रमाच्या लढाया लढणाऱ्या मुस्लिमांना आता परके मानले जात आहे. आम्ही जन्मलो या देशात, मरणारही याच देशात. आम्हाला कोणतीही ताकद रोखू शकत नाही, असा एल्गार पुकारत आम्हाला आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण हवं आहे, अशी मागणी सबंध मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली. निमित्त होते मुस्लिम समाजाच्या भव्य मूक मोर्चाचे.
  
गुरुवारी(दि.५) जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छोट्या मुला-मुलींनी भाषणे करून समाजाच्या व्यथा, पराक्रम आणि इतिहास समोर ठेवला. या भाषणाने समाजात नवी चेतना निर्माण झाली. तत्पूर्वी सकाळी साडेअकरा वाजता ईदगाह मैदानावरून मूक मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चापूर्वी मुलींनी भाषण केले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चाची सुरुवात झाली. कुठलाही गोंधळ, घोषणा किंवा चालण्यातली बेशिस्त जाणवली नाही. मार्गावरील दोन्ही रस्ते शिवाजी चौकापर्यंत फुल्ल झाले होते. लाखावर समाजबांधव मोर्चामध्ये सहभागी होऊनही शिस्त कायम होती. मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते, विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले.
 
बातम्या आणखी आहेत...