आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला पळवल्याची आईने केली तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला लातूर येथून पळवून नेले असल्याची फिर्याद त्याच्या आईने दिली असून त्यावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील धुत्ता येथील ललिता गायकवाड यांचा मुलगा गणेश (१५) हा उस्मानाबाद येथील धीरुभाई अंबानी माध्यमिक आश्रमशाळेत दहावीत शिकत आहे. एक डिसेंबर रोजी त्याच्या आईने येथील क्रीडा संकुलाजवळून सोलापूरला जाणाऱ्या बसमध्ये बसवले होते. तथापि, तो गावी परत आला नाही. शाळेत व इतरत्र शोध घेऊनही सापडला नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...