आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या’ चिमुकलीच्या मृत्यूचे गूढ उकलेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी-  गंगाखेड शहराजवळील गोदावरीच्या पात्रात आठ दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या त्या आठ महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूचे गूढ अद्यापही उकलले नाही. तिची ओळखदेखील पटू शकलेली नाही. दरम्यान, शवविच्छेदनाच्या अहवालात तिच्या मेंदूवर सूज असल्याचे म्हटले आहे. मात्र, मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे निष्पन्न होऊ शकलेले  नाही. तिचा व्हिसेरा मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला असून या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. पोलिस मात्र अद्यापही तिची ओळख पटवण्याच्याच कामात आहेत.  
गंगाखेड येथील गोदावरी नदीच्या तुळतुंब घाटावरील डोहात दि.२४ फेब्रुवारी रोजी आठ महिन्यांची बालिका मृतावस्थेत आढळून आली होती. तिचे शवविच्छेदन अंबाजोगाई  येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात करण्यात आले होते. तिचा खून झाला हे स्पष्ट होत आहे. वैद्यकीय अधिकारी हा मृत्यू पाण्यात पडल्याने झाला असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे या मृत्यूचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे. तिची ओळख पटवण्यातही पोलिस अयशस्वी ठरले आहेत. 

अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात २५ फेब्रुवारी रोजी शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह नेला होता. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यावर नंतर २६  फेब्रुवारीला शवविच्छेदन केले. दि.२ मार्च रोजी तिचा व्हिसेरा व इतर अवयव एकत्र पॅक करून आल्याने पोलिसांना नांदेड व मुंबई येथे वेगवेगळ्या चाचण्या करण्यासाठी नेण्यास अडचण आली. त्यानंतर पुन्हा दि. तीन रोजी अंबाजोगाई रुग्णालयातून चाचण्यांसाठी संच तयार करण्यात आले.  डीएनए चाचणी व व्हिसेरा मंुबईला घेऊन पोलिस जाणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...