आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेड-लिंबगाव-चुडावा-पूर्णादरम्यान 7 दिवस ब्लॉक; रेल्वे पटरीची दुरुस्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- नांदेड- लिंबगाव- चुडावा- पूर्णा दरम्यान रेल्वे पटरीच्या दुरुस्तीच्या कामाकरिता २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान रोज २.३० तास असा ७  दिवसांचा लाइन ब्लॉक घेण्यात  येणार आहे. यामुळे काही रेल्वेगाड्या अंशतः रद्द करण्यात येत आहेत, तर काही उशिरा धावतील. यात ३० नोव्हेंबर आणि ४ डिसेंबर रोजी कोणताच ब्लॉक घेण्यात येणार नाही. सकाळी ११.५० मिनिटे ते दुपारी २.२०  वाजेपर्यंत हा लाइन ब्लॉक घेण्यात येत आहे. 

 

ब्लॉकमुळे खालील रेल्वेगाड्यांवर परिणाम 

गाडी संख्या  १७६२०  (नांदेड ते औरंगाबाद) शुक्रवार, १ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या १६७३४  (ओखा -रामेश्वरम एक्स्प्रेस) बुधवार, २९ नोव्हेंबर ६ आणि  डिसेंबर रोजी अंकाई ते पूर्णा स्थानकांदरम्यान २ तास ४० मिनिटे उशिरा धावेल. गाडी संख्या ५७५६१ (काचीगुडा ते मनमाड पॅसेंजर) नांदेड रेल्वे स्थानकावर थांबविण्यात येईल. आणि नांदेड येथूनच परत गाडीसंख्या ५७५६२ बनून नांदेड ते काचीगुडा पॅसेंजर बनून धावेल. मात्र, गुरुवार, ३० नोव्हेंबर आणि सोमवार, ४ डिसेंबर रोजी ही गाडी नियमित धावणार आहे. गाडी संख्या ५७५६२ (मनमाड ते काचीगुडा पॅसेंजर) पूर्णा रेल्वे स्थानकावरच थांबेल आणि परत पूर्णा रेल्वे स्थानकावरून ५७५६१ पूर्णा ते मनमाड बनून धावेल. मात्र, गुरुवार, ३० नोव्हेंबर आणि सोमवार, ४ डिसेंबर रोजी ही गाडी नियमित धावेल. गाडी संख्या १७६४१/१७६३९   इंटरसिटी एक्स्प्रेस ५० मिनिटे नांदेड येथे थांबेल. मात्र, गुरुवार, ३० नोव्हेंबर आणि सोमवार,४ डिसेंबर रोजी ही गाडी नियमित धावेल. गाडी संख्या १७६४०/ १७६४२ इंटरसिटी एक्स्प्रेस ६० मिनिटे पूर्णा येथे थांबेल. मात्र, गुरुवार, ३० नोव्हेंबर आणि सोमवार, ४ डिसेंबर रोजी ही गाडी नियमित धावणार आहे.  गाडी संख्या ५७५४१ (नगरसोल -नांदेड पॅसेंजर) पूर्णा स्थानकापर्यंतच धावेल आणि नांदेड येथून ही गाडी पुढील लिंक बनून गाडीसंख्या ५७५५८ अशी धावेल. मात्र, गुरुवार, ३० नोव्हेंबर आणि ४ डिसेंबर रोजी ही गाडी नियमित धावेल. 

 

सचखंड मंगळवारी दुपारी पावणेतीनला सुटेल

नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस  मंगळवार, २८ नोव्हेंबर रोजी नांदेड येथून दुपारी २.४५  वाजता सुटणार आहे. गाडी संख्या १२७१६ अमृतसर हुजूर साहिब नांदेड सचखंड  एक्स्प्रेस ही येणारी गाडी १३ तास उशिरा येत आहे. यामुळे गाडी संख्या १२७१५  हु.सा.नांदेड अमृतसर सचखंड एक्स्प्रेस मंगळवारी सकाळी ०९.३० वाजता एेवजी दुपारी २.४५ वाजता सुटेल. ही माहिती नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वे विभागाने दिली.

बातम्या आणखी आहेत...