आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागदच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या मनीषा ताटूंची बिनविरोध निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागद - कन्नड तालुक्यातील नागद ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या मनीषा ताटूंची निवड करण्यात आली. माजी सरदारसिंग चन्नावत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने हे पद रिक्त झाले होते.

माजी सरपंच चन्नावत यांच्यासह सदस्य सुभाष शिरा या दोघांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले होते. अपर जिल्हाधिकार्‍यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. तसेच नवीन सरपंच निवडीचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधावारी सरपंच निवड प्रक्रिया घेण्यात आली. सकाळी दहा ते 12 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. यात दहापैकी केवळ सहाच सदस्य हजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा ताटू यांचा सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी निवड झाल्याची घोषणा दुपारी दोन वाजता निवडणूक अध्यासी अधिकारी आर. बी. महाजन यांनी केली. निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी तलाठी ई. एस. डहाके, ग्रामविकास अधिकारी बी. जे. शिरसाट आदींची उपस्थिती होती.