आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहाटे वासुदेव... दुपारी कव्वाली, रात्री एलईडीद्वारे प्रचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी प्रचारासाठी अनाेखी हायटेक यंत्रणा राबवली अाहे. यात लाेप पावत चाललेल्या कलाकारांना राेजगार मिळावा म्हणून वासुदेव हे भूम, परंडा व बीड जिल्ह्यातील अाहेत. कव्वालीसाठी कव्वाल हे मालेगाव येथील असून एलईडी स्क्रीन सवारीसाठी मध्य प्रदेश व मुंबई येथील टीम असल्याचे हायटेक इलेक्शन मल्टी सर्व्हिसेस अँड कंपनीचे संचालक सुशांत खवतड यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.
बीड शहरात पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराचे तंत्र बदलले. २५ प्रभागांतील ५१ उमेदवारांच्या प्रचारासाठी ४० वासुदेवांना पाचारण केल. सकाळच्या वेळी वासुदेव निवडणूक प्रचार करत आहेत.
वासुदेवांची ३ पथके : प्रत्येकी १० जणांचे वासुदेवांची ३ पथके पहाटे सहापासून दुपारी ११ पर्यंत तीन प्रभागांत पाेहोचून अाेव्या, जाहीरनामा व पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा लेखाजाेखा गाऊन सांगत अाहेत.
पथकात १५ कव्वाल : कव्वाली पथकामध्ये १५ कव्वालांचा समावेश अाहे. हे सर्व मालेगाव येथील असून सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे शहरातील तीन प्रभागांत फिरून कव्वालीद्वारे प्रचार करत अाहेत.
सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत शहरातील मार्गांवर, रहदारीच्या िठकाणी एलईडी स्क्रीन सवारी फिरवली जाते. यात १ सवारी मध्य प्रदेश दाेन, मुंबईमधील सवारी अाहेत. १५ फूट उंचीवरून प्रचारातील गाणे, विकासकामे, क्लिप दाखवल्या जात अाहेत.
बातम्या आणखी आहेत...