आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कन्नडला काँग्रेसतर्फे स्वाती कोल्हे, आघाडीकडून सरला वाडेकरांनी दाखल केली उमेदवारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा पाचव्या दिवशी बुधवारी (दि. २३) नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्षा स्वाती संतोष कोल्हे यांनी, तर आघाडीच्या वतीने सरला वाडेकर यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. आजपर्यंत नगराध्यक्षपदासाठी केवळ दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ आजचा आणि उद्याचा दिवस शिल्लक आहे. शुक्रवारी, दि. २५ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे शक्य असल्याने येत्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढणार आहे.

काँग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्षा स्वाती कोल्हे यांनी अर्ज दाखल करतेवेळी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, किसनराव कोल्हे, रंजना राठोड, प्रेमसिंग बैनाडे, प्रतिभा वाडेकर, सीमा कोल्हे, रवींद्र राठोड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. स्व. रायभान जाधव विकास आघाडीच्या वतीने सरला वाडेकर यांनी अर्ज दाखल केला. या वेळी संजना जाधव, विलास वाडेकर, शेख इफ्तेखार, पवन सोनवणे यांची उपस्थिती होती.

नगरसेवक पदासाठी ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नगराध्यक्ष संतोष कोल्हे, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद, निर्मलाबाई कदम, अनिल गायकवाड, रंजना राठोड, कविता रत्नाकर पंडित, शेख नफिसा बेगम इसरार, साईनाथ अल्हाड, शेख अजीज शेख मजिद, शेख मुस्तकीम शेख महेमूद, शेख शफियाबेगम अबरार, संतोष पवार, भारती, जिजाबाई वेताळ, श्रीराम घुगे, अर्चना आव्हाळे, कडुबा पवार, अंबादास सगट, पवन सोनवणे, अखिलाबेगम असिफ अली आदींचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी विनोद गुंडमवार, संतोष आगळे, प्रशांत देशपांडे आदींसह कर्मचारी काम पाहत आहेत.
बातम्या आणखी आहेत...