आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिका निवडणूक विकासाचे मुद्दे प्रचारातून हद्दपार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - हिंदी, मराठी चित्रपटातील गीते, लोकप्रिय संवादांच्या कर्णकर्कश आवाजात उमेदवारांचा प्रचार करत एकामागोमाग वाहने फिरत असल्याने शहरातील नागरिक वैतागले आहेत. शहराच्या दोन किलोमीटरच्या परिघात तब्बल ५० वाहनांद्वारे आवाजाची मर्यादा ओलांडून सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचार सुरू असून हा गोंगाट थांबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

पालिका निवडणूक मतदानास केवळ ८ दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच पक्षांचे उमेदवार, त्यांच्या समर्थकांनी प्रचाराची राळ उठवली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत उमेदवार आणि त्यांचे निवडणूक चिन्ह पोहोचविण्यासाठी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. यामध्ये स्पीकर लावून वाहनांद्वारे प्रचार होत आहे.

तुळजापूर शहराचा विस्तार केवळ २ किलोमीटर परिघात आहे. यामध्ये ५० वाहनांद्वारे स्पीकर लावून प्रचार सुरू आहे. ५ मिनिटांच्या अंतराने प्रचार वाहने येत असल्यामुळे जनता वैतागली आहे. लहान मुले व वृद्धांना याचा विशेष त्रास होत आहे.

जनता विकास योजना ऐकण्यास उत्सुक
नगरपालिका निवडणुकीत विकासाचे मुद्दे मागे पडले आहेत. प्रचारात केवळे एकमेकांचे उणेदुणे काढणे, टीका करण्यावरच प्रचार मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. शहरात आतापर्यंत केलेला विकास व भविष्यातील विकास योजना ऐकण्यास जनता उत्सुक आहे.

ध्वनिप्रदूषण तपासावे-
सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत दररोज एकच-एक कॅसेट ऐकून जनता वैतागली आहे. ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडली जात असून प्रशासनाने आवाजाची मर्यादा तपासण्याची गरज आहे. - कुमार टोले, शहराध्यक्ष, छावा संघटना
बातम्या आणखी आहेत...