आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाचशे, हजारच्या नाेटबंदीने नगरपालिकांची झाली चांदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने अाठ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून चलनातील १ हजार व पाचशे रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या. त्यानंतर नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांच्या विविध करांचा भरणा, थकबाकी भरण्यासाठी २४ नाेव्हेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ दिली. मराठवाड्यात पालिकांमध्ये सर्वाधिक करवसुलीत बीड पालिका अव्वल ठरली असून १८ नाेव्हेंबरपर्यंत हजार-पाचशेच्या नाेटबंदीत पालिकांची मात्र चांदी झाली. अायत्या चालून अालेल्या या वसुली माेहिमेत नांदेड, बीड, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यांतील पालिकांची अाघाडी अाहे.

राज्य शासनाने ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत नागरिकांकडून या जुन्या चलनाच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी दिली हाेती. त्यात पुन्हा वाढ करून १४ नाेव्हेंबर राेजी रात्री बारा वाजेपर्यंत वसुली माेहीम सुरू ठेवण्याचा अध्यादेश शासनाचे सहसचिव ज.ना. पाटील यांनी जारी केला हाेता. त्यानुसार १४ नाेव्हेंबरच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत मराठवाड्यातील ५२ नगरपालिका अाणि १६ नगर पंचायतींमधून ११ काेटी ४४ लाख ६ हजार रुपयांच्या एक हजार अाणि पाचशे रुपयांच्या नाेटांद्वारे वसुली झाली हाेती. त्यामुळे राज्य शासनाने पुन्हा नागरिकांचा करभरणा करण्याकडे वाढलेला कल लक्षात घेत जुन्या नाेटा करस्वरूपात भरून घेण्यास २४ नाेव्हेंबरपर्यंत मुदतवाढ िदली.

त्यानुसार १९ नाेव्हेंबरपर्यंत मराठवाड्यातील पालिकानिहाय वसुलीत बीड जिल्हा : दाेन काेटी ९३ लाख ६७ हजार, परभणी जिल्हा : एक काेटी ३० लाख ९४ हजार, जालना जिल्हा : एक काेटी ७० लाख ३८ हजार, उस्मानाबाद जिल्हा : एक काेटी ८३ लाख ४२ हजार, नांदेड जिल्हा : तीन काेटी ४५ लाख ३३ हजार रुपये तर लातूर जिल्हा : एक काेटी ३७ लाख रुपये अशी करस्वरूपात वसुली झाली.

शेवटचे चार दिवस
जिल्ह्यातील सहा नगरपालिका व पाच नगर पंचायतींना करवसुली करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात अाले. जुन्या नाेटा करस्वरूपात भरून घेण्यास चार दिवसांची मुदत राहिली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामावर परिणाम न हाेऊ देता कामकाज करावे.- सतीश शिवणे, जिल्हा प्रशासन अधिकारी, बीड
बातम्या आणखी आहेत...