आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुनाट इंजिनमध्ये बिघाड; नगरसोल दोन तास लेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - नगरसोलकडून नांदेडकडे जाणार्‍या नगरसोल पॅसंेजरचे इंजिन शनिवारी सकाळी आठ वाजेदरम्यान बंद पडले. करमाड ते बदनापूर रेल्वेस्थानकादरम्यान हा प्रकार घडला. त्यामुळे ही पॅसंेजर दोन तास उशिराने धावली. इतर रेल्वेगाड्यांवर मात्र याचा परिणाम झाला नाही.

पॅसेंजर (क्रमांक ५७५४१) नगरसोल येथून सकाळी साडेपाच वाजता निघते, तर औरंगाबाद रेल्वेस्थानकावर साडेसात वाजता पोहोचते. शनिवारी ही गाडी २० मिनिटे उशिराने धावली. पुढे करमाड ते बदनापूर स्थानकादरम्यान या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे गाडी जागेवरच थांबली. या प्रकाराची माहिती मिळताच औरंगाबाद येथून इंजिन मागवण्यात आले. त्यासाठी जवळपास दोन तासांचा कालावधी लागला. यामुळे ही गाडी १०.५८ वाजता बदनापूर स्थानकावरून जालन्याकडे निघाली. औरंगाबाद ते जालना तसेच जालना ते परतूर या ठिकाणी प्रवास करणार्‍या प्रवाशांना औरंगाबाद-हैदराबाद या दुसर्‍या पॅसेंजरची वाट पाहत स्थानकावरच थांबावे लागले. नगरसोल नांदेड या पॅसंेजर गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. मात्र, इतर सर्व रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसारच धावल्या.

सातत्याने जुने इंजिन
दक्षिणमध्य रेल्वेकडून नांदेड विभागासाठी सातत्याने जुनेच इंजिन दिले जातात. त्यामुळे अशा प्रकारे रेल्वे खोळंबण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. सिकंदराबाद येथील रेल्वेच्या अधिकार्‍यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीकडून अनेक वेळा करण्यात आली. मात्र त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही.

बिघाड नेहमीचाच
- १०मार्च २०१५ - नरसापूर-नगरसोल या रेल्वेचे इंजिन परतूर तालुक्यातील सातोना येथे बंद पडले होते. त्यामुळे ही रेल्वे दोन तास थांबून होती.
- २९मार्च २०१५ - निझामाबाद-पुणे पॅसंेजरच्या इंजिनमध्ये परतूर-जालनादरम्यान बिघाड झाल्याने ही गाडी सहा तास उशिराने धावली.
- मे२०१४ - मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसचे इंजिन परतूरपासून सहा किलोमीटरवर बंद पडल्याने ही रेल्वे तीन तास उशिराने धावली.
बातम्या आणखी आहेत...