आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ओव्हरटेक’चा प्रयत्न; दुचाकीवरील तिघे ठार, नागपूर- मुंबई एक्सप्रेस हायवेवरील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
लासूरस्टेशन - नागपूर- मुंबई एक्सप्रेस हायवेवर सावंगी चौकापुढे असलेल्या काळवणे पेट्रोलपंपानजीक ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या  प्रयत्नात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेले तरूणांमध्ये किरण अशोक भुसारे २४, अक्रम शमशोद्दीन शेख २२, आकाश बाबासाहेब नवनिधे २१, सर्व राहणार वाहेगाव ता. गंगापूर यांचा समावेश असून हे तरूण सदगुरू योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहासाठी जात होते. व ते सावंगी चौकातून काळवणे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून निघत असताना हा अपघात घडला. 
 
मयत अक्रमचे पिता  शमशोद्दीन यांच्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलिस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रक क्र. एमएच १७ टी ५५६० चा चालक एकनाथ विठ्ठल हसे रा. तमनापूर जि. नगर हा देखील भाविकांना घेऊन सप्ताहस्थळी जात असता पेट्रोल पंपावरून दुचाकी क्र. एमएच १७ बीक्यू ९३८४ वरून पेट्रोल भरून निघाले असता समोरून आलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात  दुचाकी घसरल्याने अपघात झाला.त्यात हे युवक ट्रकच्या चाक खाली सापडून जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 
 
सप्ताह सुरू असल्याने मार्गावर वर्दळ असून पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. विशेष म्हणजे मार्गावर जडवाहतूक बंद असून येथे केवळ सप्ताहात येणारी भाविकांची वाहनांसाठी परवानगी आहे. अपघात होताच गंभीर जखमी युवकांना लासूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात अाले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. निष्काळीपणे ट्रक चालवल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदिप काळे, प्रशांत मुंडे अधिक तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...