आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीसाठी लढा, दहशतवादी देशात घुसणार नाहीत : बानगुडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिऊर- छत्रपती शिवरायांनी मराठी माणसाला मातीत नव्हे, तर मातीसाठी लढायला आणि मरायला शिकवले. मरायचेच असेल तर सीमेवर लढून मरा. शिवरायांनी मावळ्यांना बिकट परिस्थितीत लढायला शिकवले. अशाच प्रकारे आजचा भारतीय सदैव सजग राहिला तर देशात एकही दहशतवादी घुसू शकणार नाही, असे मत प्रा. नितीन बानगुडे यांनी शिऊर येथे व्याख्यानात व्यक्त केले.

माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिऊर बंगला येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. बिसलेरीचे पाणी पिऊन दुष्काळावर नियोजन करता येत नाही. 1972 च्या दुष्काळात सर्व विहिरी कोरड्या पडल्या होत्या, मात्र शिवकालीन विहिरीचे पाणी फूटभरही कमी झाले नाही, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.