आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकुलचा खुनी म्हणाला, तासभर उशीर झाला असता तर मीही संपलो असतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी पवन कोकाटे  - Divya Marathi
आरोपी पवन कोकाटे 
परभणी - नऊ वर्षांच्या चिमुकल्या नकुलला सावत्र आईनेच नियोजनबद्धरीत्या एका युवकाला मजबूर करीत त्याच्याकरवी संपवले. मात्र, तिचा डाव अवघ्या दोन दिवसांतच उघडकीस आला. मारेकऱ्याला नागपूरला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने सांगितलेली हृदयद्रावक गोष्ट अंगावर शहारे आणणारी आहे. नकुलला मारण्याचे माझे मनच होत नव्हते, दोन वेळा परभणीतून परत गेलो होतो. मात्र, त्याच्या आईने मजबूर केल्यानेच हे कृत्य केले. तुम्ही एक तास उशिरा आला असता तर माझीही डेड बॉडी सापडली असती, हे त्याचे उद्गार.

परभणीतील गंभीर व चर्चेत असलेली बाब म्हणजे कारेगाव रस्त्यावरील व्यंकटेशनगरातील नकुल व्यंकट वडगावकर (वय नऊ) या तिसरीतील बालकाची त्याच्या सावत्र आई श्वेता वडगावकरने युवक पवन कोकाटे (रा.हडको, नांदेड) याच्याकरवी केलेली हत्या. सोमवारी (दि.१५) दुपारी तीन ते सायंकाळी सातच्या दरम्यान त्याचा खून झाल्यानंतर गुरुवारी (दि.१८) पोलिसांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला. आई श्वेता व पवन कोकाटे यांना शुक्रवारी येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता आईला एक दिवसाची तर पवनला सात दिवसांची २५ पर्यंतची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. ती स्वत: पतीच्या दुकानात गेली. यादरम्यान दुपारी पवनने त्याला तोंडावर उशी ठेवून मारले. मात्र, मारल्यानंतरही आपण त्या खोलीत तब्बल एक तासभर थांबलो. केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप म्हणून नकुलच्या पायाही पडलो, असे पवन सांगतो. त्यानंतर नांदेडला पोचलो. रात्री श्वेताने फोन करून मुलगा जिवंत आहे, तू कुठेही जा, आत्महत्या कर, नाही तर काही खरे नाही. तुझ्या घरी दोन-चार लाख पाठवून देते, असे सांगितले. त्यामुळे तो नागपूरला पळून गेला. मात्र तेथे त्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार घोळत होते, असे त्याने परभणी पोलिसांना सांगताना "तुम्ही उशीर केला असता तर मीही संपलो असतो,' असे तो म्हणाला.

पुढे वाचा..
> शाळेत डबाही देत नसे...
> गर्भवती सावत्र आईकडून निर्घृण कृत्य
> चोरीचे नियोजन करून खुनाचा कट