आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळेगाव बसमधील स्फोट शोभेच्या दारूचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - नळेगावात शुक्रवारी एसटी बसमध्ये झालेला स्फोट लग्नामध्ये उखळीद्वारे आवाज करून आतषबाजी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या गंधक आणि पोटॅशचा होता, असे नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संदीप बिष्णोई यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या प्रकरणी स्फोटक पदार्थांची वाहतूक करणारा नारायण ढाले, त्याची गंभीर जखमी पत्नी जयर्शी ढाले (गोंथी, ता. औराद, जि. बिदर) आणि स्फोटक विकणारा शिवराज आवडके, त्याचा मुलगा कैलाश (मुक्रमाबाद, जि. नांदेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील जयर्शी वगळता इतर तिघांना अटक झाली आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही याला दुजोरा दिला .