आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामलगावच्या आशापूरक गणपतीची शेंदूराची खोळ अचानक पडली; गणेशभक्तांनी पुन्हा केले शेंदूर लेपन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- भारतातील 21 सुविख्यात गणपती पैकी एक असलेल्या बीड तालुक्यातील नामलगाव येथील आशापूरक गणपती मंदिरात आज (बुधवारी) सकाळी दैनंदिन आरतीनंतर गणेशमूर्तीवरील शेकडो वर्षांची शेंदूराची खोळ गळून पडली. ही वार्ता गावात वार्‍यासारखी पसरली. गावकर्‍यांसह पुजारी, गणेशभक्तांनी मंदिरात धाव घेतली. मूर्तीला अभिषेक, पूजा करून नवीन शेंदूराचे लेपन  केले. या मूर्तीवर वस्त्र व अलंकार चढवताच ही गणेशमूर्ती देखणी व गोजिरी दिसू लागली.

नामलगाव येथील आशापूरक गणेश मंदिरात बुधवारी सकाळी साडेसात वाजता दैनंदिन  पूजा, नेवैद्य, आरती झाल्यांनतर अचानक गणेशाची शेंदराची खोळ गळून पडली. मंदिराच्या आतील गाभाऱ्यात शेंदूराच्या आवरणाचे तुकडे पाहुन मंदिराचे पुजारी आणि ग्रामस्थांसह ग्रामिण पोलिस, धर्मादाय आयुक्तांना माहिती दिली. त्यांनतर ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांसह मंदिराचे पुजारी, पोलिसांच्या एकमताने मंदिरातील गणेशाच्या मूर्तीचा अभिषेक करून विधिवत पूजन करण्यात आले. श्रीसुक्त, अथर्वशिर्षाचा पाठ घेण्यात आला. त्यानंतर मूर्तीला नव्याने शेंदूर लेपन करण्यात आल्यानंतर वस्त्र अलंकार चढवण्यात आले. त्यांनतर सामुदायीक आरती करण्यात आली.  मूर्तीवरून निसटुन पडलेल्या पाच क्विंटल शेंदूराच्या खोळीची पूजा करून हा शेंदुर नारद, बिंदूसरा, व कर्परा या त्रिवेणी संगमावर विसर्जित करण्यात आला आहे.  यावेळी मंदिराचे पुजारी गणेश पुजारी, उपाध्य प्रमोद कुलकर्णी, सी.ए. लड्डा, रवींद्र पाठक,माजी अध्यक्ष प्रा.सुनील धांडे ,सरपंच गोविंद शेळके, भागवत पुजारी, बाबासाहेब शेळके, अरूण शेळके ज्ञानोबा शेळके, नंदकुमार शेळके ,दादाराव डावकर आदी उपस्थीत होते. दुपारी भाजपाचे  जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे,भाजयुमाचे जिल्हाध्यक्ष  स्वप्नील गलधर, भारत तोंडे यांनी भेट देऊन आरती केली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... वस्त्र व अलंकार चढवताच दिसू लागले गणेशाचे देखणे आणि गोजिरे रुप...
बातम्या आणखी आहेत...