आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्‍ये नाना-मकरंद, म्‍हणाले- हुंडा घेणारे नामर्द, लग्‍नात भपकेबाजपणा टाळावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - सामुहिक विवाहासाठी सर्वांनी पुढाकार घ्‍यायला हवा. लग्‍नात होणारा अतिरीक्‍त खर्च टाळून, लग्‍नात भपकेबाजपणा करू नये असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी बीडमध्‍ये केले आहे. बीड शहरात सुरू असलेल्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात 'नाम' फाऊंडेशनच्यावतीने बुधवारी दुपारी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी नाना आणि मकरंद बीडमध्‍ये आहेत.
लग्‍नात किती खर्च करावा हा ज्‍याचा त्‍याचा प्रश्‍न - नाना
औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुलीच्‍या लग्‍नात केलेल्‍या अतिरिक्‍त खर्चाच्‍या पार्श्‍वभूमिवर माध्‍यमांनी नाना आणि मकरंद यांना प्रश्‍न विचारला. त्‍यावर नाना पाटेकर म्‍हणाले की, लग्‍नात किती खर्च करावा हा ज्‍याचा त्‍यांचा वैयक्‍तिक प्रश्‍न आहे. आपल्‍याला जे योग्‍य वाटते ते आपण केले पाहिजे. पण माझ्याकडे खूप पैसे आहेत. तो कुठे वापरावा हे मला कळायला पाहिजे, असेही नाना यावेळी म्‍हणाले.
मकरंद अनासपुरे - लग्‍नात होणारा भरमसाठ खर्च व भपकेबाजपणा टाळायला हवा. हुंडा घेऊन नये. हुडा घेणे हा नामर्दपणा आहे.
'एक गाव एक लग्न तिथी'
- रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या संगीत तुलसी रामायण कथेत सिता-स्वंयवर प्रसंगी होईल विवाह सोहळा.
- वधु-वरांना आशीर्वाद देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची उपस्‍थिती.
- 'नाम' फाऊंडेशनच्या वतीने वधु-वरांना संसारोपयोगी साहित्य दिले जाणार आहे.
- दुष्काळाग्रस्‍त शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेतल्यानंतर 'नाम'ने 'एक गाव एक लग्न तिथी' उपक्रम राबवला.