आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड शहरात वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीलेश तुषारभाई पटेल - Divya Marathi
नीलेश तुषारभाई पटेल

नांदेड - शहरात धुळवडीच्या आनंदाला गालबोट लागले. सोमवारी तीन जणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याने आनंदावर विरजण पडले. गंगाचाळ भागात राहणारा र्शीनिवास गणेश चेलमेल (26) हा तरुण दुपारी 12 वाजेच्या सुमाराला रंग खेळून उर्वशी मंदिराजवळ गोदावरी नदीवर अंघोळीसाठी गेला. त्या वेळी पात्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला नीलेश उमाकांत गिरबिडे (20, रा. प्रभातनगर) हा तरुण आपल्या मित्रासोबत विष्णुपुरी बंधार्‍यात अंघोळीसाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. तो ग्रामीण तंत्रनिकेतनचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. याच ठिकाणी दुपारी साडेतीनच्या सुमाराला नीलेश तुषारभाई पटेल (24, रा. मगनपुरा) याचा बुडून मृत्यू झाला. तो मित्रासोबत विष्णुपुरी बंधार्‍यावर अंघोळीसाठी गेला होता.


नीलेश याच्या आजोबाच्या पेट्रोल पंपावर काम करीत होता. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विष्णुपुरी जलाशयात बुडून मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही तरुणांवर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.