आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानसेवा सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाचे सहकार्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - विमानसेवा सुरू होण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा तसेच प्रवाशांची मागणी या निकषावर नांदेडकडे सर्वाधिक क्षमता आहे. विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, त्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले.

विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षात बैठक झाली त्या वेळी ते बोलत होते. एअर इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक के. कृष्णकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, आयुक्त सुशील खोडवेकर, सहायक पोलिस आयुक्त पंकज देशमुख, नियोजन अधिकारी डॉ. किरण गिरगावकर या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, शीख बांधवांसाठी नांदेड हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. देश-विदेशातील शीख बांधव येथे बारा महिने दर्शनासाठी येत असतात. २०१० च्या सुमाराला बंद पडलेली येथील विमानसेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी सातत्याने होत असते.
दरम्यान, एअर इंडियाला अपेक्षित प्रवासी संख्येसह अन्य काही बाबींची माहिती अहवाल स्वरूपात सादर केली जाणार असल्याचे सहायक महाव्यवस्थापक कृष्णकुमार यांनी सांगितले.

चार शहरांत विमानसेवा
सोलापूर - नांदेड, सोलापूर, रत्नागिरी कोल्हापूर या शहरांत एअर इंडियाची विमान सेवा सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबतचा प्रस्ताव एअर इंडियाचे सरव्यवस्थापक मुकेश भाटिया यांच्याकडे पाठवला आहे. लवकरच मुंबईतून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी माहिती एअर इंडियाच्या वाणिज्य विभागाचे विक्री अधिकारी अजित सलगरे यांनी दिली.