Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | nanded Coporation election people accept congress or rejected bjp

नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेसने काय कमावलं नि भाजपचा कुठे फसला 'गेम'?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 13, 2017, 10:08 AM IST

राज्यात काय तर जवळपास संपूर्ण देशात पराभवाच्या छायेत असलेल्या काँग्रेसला अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वात नांदेड महापालिक

 • nanded Coporation election people accept congress or rejected bjp
  औरंगाबाद- राज्यात काय तर जवळपास संपूर्ण देशात पराभवाच्या छायेत असलेल्या काँग्रेसला अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वात नांदेड महापालिकेच्या रुपाने मोठा विजय मिळवून आहे. काँग्रेसने 71 जागांवर निर्विवाद विजय मिळवून चव्हाण यांनी पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. नांदेडमधील एकतर्फी विजय काँग्रेसला आगामी काळात मोठे नैतिक बळ मिळवून देईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

  अनेक दिवसांनी काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचा सकाळपासून जल्लोष पाहायला मिळाला. नांदेड महापालिकेत निर्विवाद बहुमत मिळवून अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे. शहरी समस्या असतानाही नांदेडकरांनी अशोक चव्हाणांच्या बाजूने कौल दिल्याने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एकत्रित विरोध मोडून काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे.

  विशेष म्हणजे, एमआयएमची नांदेडमधून राज्यात एन्ट्री झाली होती. त्याच महापालिकेत त्याच मतदारांनी एमआयएमला पूर्णपणे नाकारत त्याचा सुफडासाफ केला. त्यामुळे मुस्लिम समाज काँग्रेसच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... नांदेडमध्ये काँग्रेसने काय कमावलं नि कुठे फसला भाजपचा 'गेम'?
 • nanded Coporation election people accept congress or rejected bjp
  काँग्रेसने काय कमावलं?
  - नांदेडमध्ये निर्विवाद बहुमत मिळवून अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे. 
  - शहरात अनेक नागरी समस्या असतानाही जनतेने अशोक चव्हाणांच्या बाजूने कौल दिला आहे. 
  - भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एकत्रित विरोध मोडून अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. 
  - निवडणुकीच्या काळात अंतर्गत मतभेद विसरुन एकत्र काम करून विजय मिळवता येतो, हे काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. 
  - नांदेडच्या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांना नवी उभारी देण्याचे काम केले आहे.
  - नारायण राणेंसारख्या टीकाकार नेत्यांना अशोक चव्हाणांनी आपल्या कामगिरीतून प्रत्युत्तर दिले आहे. 

  पुढील स्लाइडवर वाचा... भाजपच्या पदरात मात्र पुरती निराशाच पडली... 
 • nanded Coporation election people accept congress or rejected bjp
  भाजपचे काय गमावलं...?
  - आयात नेते आणि उमेदवार यांच्या माध्यमातून विजय मिळवता येत नाही, हा धडा या निवडणुकीत भाजपला मिळाला.
  - प्रताप पाटील चिखलीकर या शिवसेना आमदाराला नेतृत्वाची दिलेली धुरा भाजपला चांगलीच महागात पडली. 
  - मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये मोठी सभा घेऊनी भाजपला त्याचा लाभ मिळाला नाही. 
  - राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने नांदेडमध्ये काँग्रेसच्या विजयासाठी मदत केली. 
  - पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांचे प्रश्न या मु्द्दयावर अधिक संवेदनशील व्हायला हवे, हे भाजपने समजून घ्यावे. 
  - मोदी सरकारच्या विरोधात जनतेत आणि सोशल मीडियावर असलेला रोष नांदेडच्या मतपेट्यांतून पाहायला मिळाला.

Trending