आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nanded Corporation Teach Protection To The Yung Girl And Women

नांदेड महानगरपालिकेचे युवती, महिलांना स्वसंरक्षणाचे धडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - युवतींमध्ये स्वसंरक्षणाचे बळ जागवून महापालिका गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर युवतींना मार्शल आर्ट कराटेचे प्रशिक्षण देत आहे. हे प्रशिक्षण 18 जानेवारीपासून सुरू आहे.
महिला व युवतींना स्वसंरक्षणासाठी महापालिकेने आयोजित केलेले कराटे प्रशिक्षण सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रांत होत आहे. या शिबिरात सहभागी होणा-या महिला व युवतींना मोफत प्रवेश देण्यात आला. सुमारे 300 महिला व युवतींनी शिबिरात सहभाग नोंदवला आहे.

नगरसेवकांचे पाठबळ
देशातील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहून नांदेड शहरातील महिला व युवतींमध्ये स्वसंरक्षणाचे बळ निर्माण करण्याची इच्छा होती. सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी पाठबळ दिल्यामुळे हे विचार कृतीत उतरवता आले.’’ जी.श्रीकांत, आयुक्त मनपा, नांदेड

मार्गदर्शन केंद्र सुरू करावे
महिला व मुलींनी त्यांच्याकडे असलेली सहनशीलता अन्याय सहन करण्याकरिता वापरू नये. मनपाच्या वतीने गुणवंतांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करून जिल्ह्यातील अधिका-या ंना प्रशिक्षण देण्यासाठी पाचारण करावे.’’
आनंद चव्हाण, उपमहापौर, नांदेड