आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नांदेड - नांदेड शहरात एका कारमधून 4 किलो सोने, 40 किलो चांदीसह साडेतीन लाख रुपये रोख पोलिसांनी हस्तगत केले आहेत. ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान भाग्यनगर पोलिसांनी शनिवारी रात्री ही कारवाई केली. या प्रकरणी चार आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना 26 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मालेगावमार्गे आलेल्या स्विफ्ट डिझायर कारची (एमएच 30 पी 2948) तरोडा भागात पोलिसांनी झडती घेतली. त्यात 3 किलो 862 ग्रॅम सोने,40 किलो 580 ग्रॅम चांदी व 3 लाख 67 हजार रुपये रोख रक्कम आढळून आली.कारमधील दलपतसिंह खेदसिंह राजपूत, प्रबतसिंह बागसिंह राजपूत, बालाजी ब्रह्यानंद पुरी, भुरसिंह करुणासिंह राजपूत ( सर्व रा.किल्ला रोड इतवारा) यांना अटक केली. भुरसिंह राजपूत हे सोन्या-चांदीचे व्यापारी आहेत. दलपतसिंह राजपूत व प्रबतसिंह राजपूत हे त्याचे नोकर आहेत. बालाजी पुरी हा ड्रायव्हर आहे.
हे सर्व सोने नांदेड परिसरातच विकत घेतल्याचे भुरसिंह राजपूत यांनी पोलिसांना सांगितले. तथापि या सोन्या-चांदीच्या रीतसर पावत्या मात्र त्यांच्याकडे आढळून आल्या नाहीत. या प्रकरणात पोलिसांनी जप्त
केलेली कारही राजपूत यांच्याच मालकीची आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.