आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोड्या करणार्‍या चौघांना अटक; सात लाख 85 हजारांचा ऐवज जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - जिल्ह्यात व शहरात घरफोड्या व चोर्‍या करून धुमाकूळ घालणार्‍या टोळीतील चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी शिताफीने अटक केली. या चोरट्यांकडून पोलिसांनी सात लाख 85 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून घरफोड्या व चोर्‍यांचे सत्र सुरू होते. शहरातील भाग्यनगर, शिवाजीनगर या ठाण्याच्या हद्दीत चोरांनी उच्छाद मांडला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे र्शीधर पवार यांनी या चोरांचा शोध लावण्यासाठी पथके स्थापन केली. या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सय्यद फहिम यांच्या पथकाने घरफोडी करणार्‍या चार जणांना शिताफीने अटक केली. संजय पंडितराव नामनूर (गुंडूलवाडी, जि. हिंगोली), सय्यद शायद सय्यद जाफर (21, महेबूबनगर), सय्यद अतिक सय्यद चांदपाशा (नांदेड), शेख शरीफ ऊर्फ बिल्डर शेख मोईन (नांदेड) या चार जणांचा अटक झालेल्यांत समावेश आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी 223 ग्रॅम सोन्याचे दागिने, 55 तोळे चांदीचे दागिने, लॅपटॉप, बुलेट, होंडा युनिकॉर्न, दोन स्प्लेंडर मोटारसायकल असे एकूण 7 लाख 85 हजार 565 रुपयांचे साहित्य जप्त केले.

नांदेड जिल्ह्यात घरफोड्या करणार्‍या 4 जणांच्या टोळक्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 7 लाख 85 हजारांचा ऐवज जप्त केला.