आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोकर नगर परिषदेत अशोक चव्हाण यांनाच स्पष्ट बहुमत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकर नगरपालिकेच्या प्रभाग क्र. मधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार साहेबराव सोमेवाड यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आमदार अमर राजूरकर यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. छाया: ज्ञानेश्वर सुनेगावकर, नांदेड - Divya Marathi
भोकर नगरपालिकेच्या प्रभाग क्र. मधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार साहेबराव सोमेवाड यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आमदार अमर राजूरकर यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. छाया: ज्ञानेश्वर सुनेगावकर, नांदेड
नांदेड - भोकरनगर परिषदेच्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली. १९ सदस्यांच्या पालिकेत काँग्रेसने १२ जागा जिंकल्या खऱ्या पण नगराध्यक्षपद राखीव असलेल्या एसटी गटातील एकही उमेदवार काँग्रेसचा निवडून आला नाही. त्यामुळे काँग्रेसला नाइलाजाने अपक्षाला नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा द्यावा लागणार आहे.
भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. पालिकेत काँग्रेसला १२, राष्ट्रवादीला ३, भाजप अपक्षांना जागा मिळाल्या. भोकर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद एसटीसाठी राखीव आहे. त्या दृष्टीने काँग्रेसने माजी नगराध्यक्ष नागनाथ घिसेवाड यांची चुलत बहीण विजया घुमनवाड यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरुद्ध भावजयी उषा नागनाथ घिसेवाड या भाजपकडून उमेदवार होत्या. घुमनवाड पराभूत होऊन घिसेवाड विजयी झाल्याने काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला. त्यामुळे आता काँग्रेसला नगराध्यक्षपदासाठी एक तर भाजपला पाठिंबा द्यावा अथवा अपक्ष विजयी झालेल्या साहेबराव विष्णू सोमेवाड यांना पाठिंबा द्यावा हे दोनच पर्याय आहेत.

संख्याबळ घटले
भोकरनगर परिषदेची ही दुसरी निवडणूक होती. नगरपालिकेची स्थापना स्वत: अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्री असताना २०१० मध्ये केली. त्यावेळी पालिकेत १७ सदस्य होते. पहिल्या निवडणुकीत १५ पैकी १५ सदस्य काँग्रेसचे निवडून आले, तर दोन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. या निवडणुकीत पालिकेचे सदस्य १९ झाले; परंतु निवडणुकीत काँग्रेसच्या सदस्यसंख्येत घट होऊन ते १२ वर आले. पालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सदस्यसंख्या घटल्याचेही शल्य काँग्रेसजनांना आहे. प्रदेशाध्यपद स्वीकारल्यानंतर चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या निवडणुकीत पालिकेवर वर्चस्व राखण्यात चव्हाणांना यश आले हे मात्र निश्चित आहे.

भोकर पालिकेतील विजयी सदस्य
श्रीदेवीसंतोष मारकवार, जरिनाबेगम युसूफ शेख, सुवेश सखाहारी पोकलवार, साहेबराव विष्णू सोमेवाड, गोविंदराव बाबागौड कोंडलवार, शेख वकील शेख खैराती, उषाताई नागनाथ घिसेवाड, सूर्यकांत भगवानराव चिंचाळकर, मीनाबाई भगवान दंडवे, शेख अफसर गफार, रेणुका नीळकंठ वर्षेवार, संगीता विनोद चिंचाळकर, अरुणा विनायकराव देशमुख, वनमाला पुंडलिक क्षीरसागर, खाजा तोहफीख नाजेमोद्दीन, अनिता राम जाधव, सुवर्णाबाई संभाजी वाघमारे, केशव रामा मुद्देवाड, मनोजकुमार पंढरीनाथ गिमेकर.

आमच्याकडे बछडा आहे
प्रदेशाध्यक्षअशोक चव्हाण यांना निकालाबाबत प्रतिक्रिया विचारली असता, गड आला आणि सिंह गेला हे खरे असले तरी आमच्याकडे बछडा आहे. भाजपला आम्ही मदत करणार नाही असे त्यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
भोकर नगरपालिकेच्या प्रभाग क्र. मधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार साहेबराव सोमेवाड यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आमदार अमर राजूरकर यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. छाया: ज्ञानेश्वर सुनेगावकर, नांदेड