आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड जिल्ह्यात 150 गावांची तहान टँकरच्या पाण्यावर, महिलांना दुष्काळाची अधिक झळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या वाढत असून ग्रामीण भागात दुष्काळाचे चटके अधिक तीव्रतेने बसत आहेत. जिल्ह्यात सद्य:स्थितीत 150 पेक्षा अधिक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

अत्यल्प पावसामुळे यंदा मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आहे. जिल्ह्यातही यावर्षी केवळ ४४५ मि.मी. पाऊस झाल्याने पाण्याची समस्या गंभीर आहे. विशेषत: लोहा, मुखेड, कंधार या तालुक्यात पाणीटंचाईने तीव्ररूप धारण केले आहे. लोहा तालुक्यातील ५०, कंधार तालुक्यातील ४० तर मुखेड तालुक्यातील ६५ गावांची पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र झाली. या तीन तालुक्यांत सध्या ४५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. लोहा, कंधारमध्ये पाणीपुरवठ्यासाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. मुखेडमध्येही २० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. मुखेड हा डोंगराळ व दुर्गम तालुका असून यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र आहे. भवानी तांडा, हातराळ, हाळणी, मुक्रमाबाद, देगाव तांडा, बाऱ्हाळी, आबादीनगर तांडा, कुंद्राळ या गावांसह ६५ गावे टंचाईग्रस्त आहेत.

तालुकानिहाय टँकर
नांदेड- ५, भोकर- २, हिमायतनगर- १, देगलूर- २, नायगाव- ७, मुखेड- १४, कंधार- ११, लोहा- २०, एकूण- ६२

अधिग्रहण संख्या
टँकरसाठी- ३८
टँकर व्यतिरिक्त- १४४

विहीर-बोअर अधिग्रहण गावांची संख्या- १६२