आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उडान कार्यक्रमात काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत जुंपली; पंकजा मुंडे, अशोक चव्हाणांची उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड-हैदराबाद विमानसेवा प्रारंभ प्रसंगी भाजप कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. - Divya Marathi
नांदेड-हैदराबाद विमानसेवा प्रारंभ प्रसंगी भाजप कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या.
नांदेड- उडान योजनेअंतर्गत नांदेड येथील विमानतळावर आज नांदेड-हैदराबाद या विमानसेवेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी विमानतळावर झालेल्या कार्यक्रमात श्रेय घेण्यासाठी भाजप व काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. दोन्ही बाजूंनी जोरजोरात घोषणा देण्यात येत असल्याने परिसर दणाणून गेला होता. विमानसेवेचा प्रारंभ सिमला येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकिंगद्वारे झाला व त्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. नांदेड कार्यक्रमाचेही थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत होते. सिमला येथे मोदी येताच भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदी की जय, मोदी.. मोदी.. मोदी.. अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. याबरोबरच देश के नेता कैसा हो, मोदी जैसा हो अशा जोरदार घोषणा देण्यात येत असल्यामुळे कार्यक्रम नीट पाहता येत नव्हता. पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना समज दिली.
 
पंकजा मुंडे, मोदींचेही शांततेचे आवाहन
घोषणांचा जोर एवढा वाढला होता की, कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. कार्यकर्ते, पदाधिकारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. केवळ मोदींच्या नावाने जयघोष करण्यात मग्न होते. त्यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांना मंचावर जाऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करावे लागले.
 
मुंबईचे विमान रद्दने अनेकांचा हिरमोड
नांदेड - मुंबईलाही विमानसेवा सुरू होणार होती. ही विमानसेवा आज सुरू झाली नाही. आजच्या विमानाचे अॅडव्हान्स बुकिंगही केले होते. मात्र, मुंबईला जाणारे विमान उडालेच नाही. अनेकांचा हिरमोड झाला. तांत्रिक अडचणी असल्यामुळे मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्यास आणखी आठ दिवस लागतील.
 
पुढील स्लाइडवर, नांदेड-हैदराबाद विमानसेवेस व्हिडिओ लिंकिंगद्वारे प्रारंभ.. 
बातम्या आणखी आहेत...