आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड मनपात भाजपचा गुजरात पॅटर्न; अशाेक चव्हाणांना धक्का, 11 नगरसेवक गळाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपने ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर खासदार अशोक चव्हाण यांना राजकीय शॉक दिला. (फाईल) - Divya Marathi
भाजपने ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर खासदार अशोक चव्हाण यांना राजकीय शॉक दिला. (फाईल)
नांदेड - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांना धक्का देऊन नांदेड मनपात सत्ता मिळवण्यासाठी भाजपने गुजरात पॅटर्नचा अवलंब केला अाहे. गुजरातेत काँग्रेसच्या ७ अामदारांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला हाेता. त्यानुसार नांदेडचे ११ विद्यमान नगरसेवक शिवसेना अामदाराच्या माध्यमातून भाजपने गळाला लावले अाहेत.
 
यात काँग्रेसचे पाच, शिवसेनेचे चार व राष्ट्रवादीच्या दाेघांचा समावेश अाहे. या सर्व नगरसेवकांनी अायुक्तांकडे राजीनामे दिले असून लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील. नांदेड मनपाची अाॅक्टाेबरमध्ये निवडणूक हाेत अाहे. अाजवर चव्हाणांचे प्राबल्य राहिलेल्या या मनपाची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जाेर लावला अाहे. त्यासाठी चव्हाणांचे कट्टर विराेधक व  शिवसेना अामदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले अाहेत.

अायुक्तांकडे राजीनामा देणारे नगरसेवक
काँग्रेस: सरजितसिंह गिल, किशोर यादव, अन्नपूर्णा ठाकूर, स्नेहा सुधाकर पांढरे, नवल पाेकर्णा

शिवसेना: दीपकसिंह रावत, ज्योती खेडकर, वैशाली देशमुख, विनय गुर्रम. यासाेबतच पक्षाचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख व युवा सेना जिल्हाध्यक्ष माधव पावडे यांनीही माताेश्रीवर राजीनामे पाठवले अाहेत.

‘गढी’ भाजपचे लक्ष्य
सध्या भाजपकडे दाेन नगरसेवक अाहेत. मात्र अन्य पक्षातील नगरसेवकांना भाजपमध्ये अाणून ही संख्या बहूमतापर्यंत वाढवण्याचे प्रयत्न सुरू अाहेत. भास्करराव पाटील खतगावकर, व  अाेमप्रकाश पाेकर्णा हे चव्हाणांचे निकटवर्तीयही यापूर्वीच भाजपत अाले अाहेत. त्यांच्या माध्यमातूनही चव्हाणांच्या ‘गढी’ला सुरुंग लावण्याचे प्रयत्न हाेत अाहेत.

चिखलीकरांना मंत्रिपदाची अाशा
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे समर्थक असलेल्या चिखलीकरांचे काँग्रेसमध्ये असतानाही अशाेक चव्हाणांशी कधी जमले नाही. विलासरावांच्या पश्चात काँग्रेस साेडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र या पक्षातून मंत्रिपद मिळण्याची अाशा नसल्याने अाता चिखलीकरांनी भाजपशी जवळीक वाढवली अाहे. या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्यावर ‘मिशन मनपा’ची जबाबदारी साेपवली अाहे.

मनपातील पक्षीय बलाबल : एकूण ८१ नगरसेवक : काँग्रेस: ४०, शिवसेना: १५, भाजप:२, राष्ट्रवादी काँग्रेस: १०, एमअायएम: ११, संविधान पक्ष:२, अपक्ष : १.
बातम्या आणखी आहेत...