आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी जिवंत ठेवण्याचा निर्धार करा - प्रा. तांबोळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - मराठी भाषेचा अभिमान बाळगतानाच मराठी जिवंत ठेवण्यासाठी छत्रपतींच्या जयंतीदिनी सर्वांनी निर्धार केला पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी केले. नांदेड ग्रंथोत्सव 2014 च्या समारोप समारंभात ते बोलत होते. या वेळी इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव, कवी डॉ. सुरेश सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी यू. ए. कोमवाड प्रामुख्याने उपस्थित होते. साहित्य संस्कृती मंडळ, जिल्हा परिषद, जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 17 ते 19 दरम्यान नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. प्रा. तांबोळी पुढे म्हणाले, छत्रपतींनी आपल्या काळात राजव्यवहार कोश निर्माण केला. त्याप्रमाणे राज्यशासनाने आपल्या व्यवहारात मराठीचा वापर कटाक्षाने होईल याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. इतिहास संशोधक प्रा. प्रभाकर देव म्हणाले, मराठी भाषेच्या पहिल्या ग्रंथाचा मान मराठवाड्याला आहे. सातवाहन काळात गाथा सातवाहनाची हा सातशे कथांचा तो संग्रह होता. हा उज्ज्वल ऐतिहासिक वारसा मराठीला आहे.
या वेळी डॉ. सुरेश सावंत, निर्मलकुमार सूर्यवंशी, यू. ए. कोमवाड यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांनी केले.