आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडच्या महापौर शैलजा स्वामींच्या घरावर दगडफेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- शहरातील कौठा भागात प्रस्तावित महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचा वाद चांगलाच पेटला. महापौर शैलजा स्वामी यांच्या शोभानगरातील घरावर दगडफेक करण्यापर्यंत हा वाद विकोपाला गेला.

तीन वर्षांपूर्वी महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर शैलजा स्वामी यांनीच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडून कौठा भागात बसवेश्वरांचा पुतळा उभा करण्याला मंजुरी घेतली. आयजी ऑफिसजवळील मोक्याची जागाही निश्चित करण्यात आली; पण काही कारणामुळे पुतळा उभा राहिला नाही. शैलजा स्वामी आता महापौर झाल्या आहेत. त्यांनी पुतळा बसवण्याच्या कामात पुढाकार घ्यावा, अशी मागणी लिंगायत समाजाकडून होत आहे. पुतळ्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली असून त्याचे अध्यक्षपद शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे यांच्याकडे आहे. महापौर काँग्रेसच्या आहेत.

महापालिकेलाकुलूप ठोकण्याचे आंदोलन
पुतळ्यासाठीजागेची अडचण सांगितली जाते. प्रस्तावित ठिकाणी ४५० चौरस फूट जागा महापालिकेची आहे. तिथे पुतळा उभा करावा. नंतर सुशोभीकरणासाठी जागा अॅक्वायर करावी. पुतळ्याची घोषणा झाल्यानंतर गेली अनेक वर्षे लोक जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी पूजा करतात. लोकांची श्रद्धा त्या ठिकाणावर आहे. पुतळा त्याच ठिकाणी व्हावा, अशी समाजाची इच्छा आहे. मध्यंतरी जागा बदलण्याच्याही काही हालचाली झाल्या. त्यामुळे साशंकता निर्माण झाली. आता आयुक्तांनीही स्पष्ट केले आहे की, पुतळ्याला शासनाची परवानगी नाही. ही परिस्थिती लक्षात घेता पुतळ्याबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. पुतळ्याबाबत अंतिम निर्णय झाला नाही, तर २२ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर महापालिकेला कुलूप ठोकण्याचे आंदोलन केले जाईल, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश कौडगे यांनी दिली.

गाडीच्या काचा फुटल्या
मंगळवारीरात्री १२ वाजताच्या सुमाराला मोटारसायकलवर आलेल्या जणांनी शोभानगरातील महापौराच्या घरावर दगडफेक केली. त्यात त्यांच्या खासगी गाडीच्या काचा फुटल्या. किशोर स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही जणांनी तोंडाला काळे रुमाल बांधले होते. दगडफेक करून त्यांनी त्वरित पळ काढला.

पुतळा त्याच ठिकाणी
महात्मा बसवेश्वरांचा पुतळा प्रस्तावित ठिकाणीच व्हावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. त्याच ठिकाणी होईल; परंतु पुतळ्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय, शासनाचे काही नियम यामुळे थोडे अडथळे निर्माण झाल्याने विलंब होत आहे. त्यावर मात करून पुतळा निश्चित बसवला जाईल. शैलजास्वामी, महापौर, नांदेड.
बातम्या आणखी आहेत...