आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेड मनपात ‘अच्छे दिन’वरून गुद्दागुद्दी, शिवसेना-एमआयएम सदस्यांत हमरीतुमरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - महानगरपालिकेची गुरुवारी झालेली सर्वसाधारण सभा वादळी ठरली. या सभेत शिवसेना आणि एमआयएमचे नगरसेवक हमरीतुमरीवर येत एकमेकांशी भिडले. आयुक्तांच्या विधानावर निषेध व्यक्त करत महापौर अब्दुल सत्तार यांनी सभाच गुंडाळली.
शहरातील विविध विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. सभेच्या प्रारंभी शिवसेनेचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव संमत झाल्यावर संसदेत बहुमत मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावावर बोलताना एमआयएमचे गटनेते शेरअली यांनी शिवसेना-भाजपने या विजयाने हुरळून जाऊ नये. तुम्हाला बहुमत मिळाले असले तरी 60 टक्क्यांहून अधिक लोकांनी आम्हालाही मते दिली. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले, परंतु ते कोठे दिसत नाही. रेल्वेचे भाडे वाढले. पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या. आता गॅसचीही दरवाढ होणार आहे. अच्छे दिन कहां है?’ अशी टीका केली. त्यावर आक्षेप घेत शिवसेनेचे दीपकसिंह रावत, अशोक उमरेकर, बालासाहेब देशमुख या सदस्यांनी एमआयएम लोकसभेत काँग्रेसला मॅनेज झाली. पैसे घेऊन त्यांनी उमेदवार उभा केला नाही, असा आरोप केला.
यापूर्वीही झाला होता वाद
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या र्शद्धांजलीच्या ठरावावरूनही यापूर्वी पालिकेच्या सभेत वाद उफाळला होता.
आयुक्तांच्या विधानावर सदस्य आक्रमक
शिवसेनेच्या आरोपानंतर एमआयएमचे नगरसेवक शेरअली, हबीब बवाजीर, हबीब बागवान, फारूख बदवेल, चांदपाशा कुरेशी, हसन अल कसेरी हे आक्रमक होत महापौरांच्या आसनासमोर आले. त्याच वेळी शिवसेनेचे दीपकसिंह रावत, अशोक उमरेकर, बालासाहेब देशमुख व इतर सदस्यही आक्रमक होत त्यांना भिडले. त्या वेळी थोडी गुद्दागुद्दी झाली. इतर सदस्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.
नगरसेवक भिडले
शिवसेना-एमआयएमच्या वादानंतर शहरात जन्म-मृत्यूचे दाखले लोकांना मिळत नाहीत. लोकांना त्रास दिला जातो. आरोग्य अधिकारी डॉ. मीरा कुलकर्णी यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न काँग्रेस, एमआयएमच्या सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर आयुक्त जी. र्शीकांत यांनी आपण अधिकार्‍यांची पाठराखण करणार, असे विधान केल्याने काँग्रेस व एमआयएमचे सदस्य आक्रमक झाले. महापौरांसह सर्वांनी आयुक्तांच्या या विधानाचा निषेध केला. त्यानंतर संतप्त नगरसेवकांच्या भावना लक्षात घेऊन महापौर अब्दुल सत्तार यांनी सभाच गुंडाळली.