आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन्यथा रेल्वेच्या कारभाराची सीबीआय चौकशीची मागणी करू- खासदार खैरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- रेल्वेचे अधिकारी ट्रॅव्हल्सचे चालक यांच्यात आर्थिक लागेबांधे असल्यामुळेच नांदेड-पुणे गाडी प्रवाशांच्या सोयीनुसार सोडली जात नाही. ही मागणी मान्य झाली नाही तर या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करू, असा इशारा विभागातील खासदारांनी रेल्वेचे महाप्रबंधक रवींद्र गुप्ता यांना शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिला. नांदेड रेल्वे विभाग मध्य रेल्वेला जोडा, अशी एकमुखी मागणीही खासदारांनी केली.

रेल्वे अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील खासदारांची बैठक विभागीय व्यवस्थापक कार्यालयात झाली. या बैठकीत नांदेड-पुणे गाडीचा मुद्दा खासदारांनी चांगलाच लावून धरला. पुणे शैक्षणिक हब आहे. मराठवाड्यातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्याला आहेत. मराठवाड्यातून जवळपास २५० ट्रॅव्हल्स दररोज पुण्याला जातात. त्या सर्व हाऊसफुल्ल जातात. खासगी वाहतुकीचे मालक मनमानी कारभार करतात. लोकांची मोठ्या प्रमाणात नाडवणूक केली जाते. हे लक्षात घेऊन सात वर्षांपासून नांदेडहून सायंकाळी सुटणारी पुण्यात सकाळी पोहोचणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी सातत्याने केली जाते. अनेक कारणे सांगत ही मागणी ताटकळत ठेवण्यात येते.

खासदारांच्या मागण्या
>नांदेड-पुणेगाडी प्रवाशांच्या सोयीनुसार पुण्यात सकाळी ६-८ वाजेपर्यंत पोहोचेल अशी सोडावी.
>नांदेड-श्रीगंगानगर,कोल्हापूर-धनबाद, पूर्णा-पाटणा या गाड्यांचे वेळापत्रक आठवड्यातून सात दिवस नागपूरसाठी गाडी होईल असे करावे.
>परभणी-मनमाडदुहेरीकरणाचे सर्वेक्षणाचे काम त्वरित पूर्ण करावे.
>मुदखेड-परभणीदुहेरीकरणाचे काम विद्युतीकरणासह पूर्ण करावे.
>लातूर-मुंबईगाडीचे विस्तारीकरण रद्द झाले असेल तर नांदेड-लातूर दोन-तीन डबे गाडी गाडीला जोडावेत.
>उमरी,धर्माबाद, गोकुंदा येथे ओव्हरब्रिज बांधावेत.

रेल्वे अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक रवींद्र गुप्तांच्या उपस्थितीत विभागातील खासदारांची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे प्रश्नाबाबत खासदारांची उदासीनता दिसून आली. १४ पैकी केवळ खासदार अशोक चव्हाण, राजीव सातव, चंद्रकांत खैरे, संजय जाधव हे चारच खासदार उपस्थित होते.