आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडच्या विद्यापीठात "इन्स्पायर'चे आयोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या इन्स्पायर या योजनेच्या पाचदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन २ ते ६ सप्टेंबरदरम्यान करण्यात आले आहे. यात अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत त्यांच्या महाविद्यालयामार्फत अर्ज सादर करावे, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले.
देशाचा विकास देशातील शास्त्रज्ञांनी घडवून आणलेल्या संशोधनामुळे होत असतो. विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड लहान वयातच निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक विद्यापीठात दरवर्षी इन्स्पायर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दहावीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी, जे विज्ञान शाखेच्या अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी भविष्यात मोठे शास्त्रज्ञ व्हावे या अपेक्षेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
बातम्या आणखी आहेत...