आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारेगावच्या व्यक्तीकडे 9 लाखांच्या बाद नोटा, चकलांबा फाट्याजवळ जमीर खानला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- नगर जिल्ह्यातील शेवगावहून गेवराईकडे येणाऱ्या एका कारमधून पोलिसांनी ९ लाख रुपये मूल्याच्या जुन्या एक हजार व पाचशेच्या नोटा जप्त केल्या. या प्रकरणी जमीर खान यास चकलांबा फाट्याजवळ पाेलिसांनी पकडले.

औरंगाबादच्या नारेगाव येथील रहिवासी जमीर खान हा नगर जिल्ह्यातील  शेवगावहून गेवराईकडे  एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी येत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना  मिळाली. गुप्त माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी रात्री दहा वाजता  चकलांबा फाट्यावर सापळा रचला.
 
शेवगावहून गेवराईकडे येणारी एक कार (एमएच-२१, व्ही. ७८०२) थांबवून पोलिसांनी झडती घेतली. कारमध्ये  एक हजार रुपयांच्या जुन्या पाचशे  नोटा तर पाचशे रुपयांच्या ९०० नोटा सापडल्या. एकूण ९  लाख पन्नास हजार रुपयांच्या नोटा  पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी जमीर खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
चकलांबा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, बी.बी. वनवे, बी.वाय मोरे, बी.के  बचाटे, आर.बी. सिरसाट यांनी कारवाई केली.जमीर खान हा गेवराईत नेमका कोणाकडे  नोटा बदलण्यासाठी येत होता याची चौकशी पोलिस करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...