आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्यांप्रती संवेदना नको; नरेंद्र महाराजांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- तुम्ही जन्म कोणाला विचारून घेतलेला नसतो. ते नियती ठरवते. तसेच मरणाचेही आहे. तुम्ही मरणाचा निर्णय घेऊ नका आणि असे जे करत आहेत ती भ्याड माणसे असून त्यांना मुक्ती, मोक्ष नाही. आत्महत्या करणाऱ्यांबाबत हळहळ अथवा कुठलीही संवेदना दाखवू नका, असे स्पष्ट मत नाणीज पीठाचे नरेंद्र महाराज यांनी येथे गुरुवारी व्यक्त केले.

विज्ञानाच्या नावाखाली देवाचे अस्तित्व नाकारून पुरोगामी असल्याचा टेंभा मिरवणाऱ्यांना फटकारत त्यांनी अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून मार्गक्रमण करणारा व्यक्तीच पुरुषोत्तम असल्याचे प्रतिपादन केले.

धानोरा रोडवरील नरेंद्र मोदी सभा मैदानावर आयोजित दर्शन व प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते. ‘अहंकार आाणि अध्यात्म व विज्ञान’ यावर अधिक विस्तृतपणे मार्गदर्शन केले. महाराज म्हणाले, विज्ञानाने क्रांती केलेली आहे. ती नाकारून चालत नाही. परंतु माणूस अशांत झाला आहे. त्याला मन:शांती हवी आहे. त्यासाठी अध्यात्म मार्ग आहे. अध्यात्मात माणसात नीतिमूल्यांची रुजूवात होते. राक्षसी प्रवृत्ती गळून पडते. माणूसपणाचे संस्कार होतात. वास्तविक माणूसही एक प्राणी आहे. राक्षसी, हिंस्र प्रवृत्ती त्याच्यामध्येही आहे, असे सांगून कृष्ण देव तर त्याचाच मामा कंस हा अहंकाराने आणि सत्तेच्या मदांधतेने राक्षस म्हणूनच ओेळखला गेला.

अवयव दान करा
नरदेह हा जगाच्या कल्याणासाठी असून जगतानाही व मरणानंतरही तो कामी येण्यासाठी मरणोपरांत शरीराच्या अवयवांचे दान करून नरदेहाचे सार्थक करावे, असे आवाहन केले.

रक्तदानास गर्दी
सर्कस मैदानावर प्रवचन व दर्शन सोहळ्यानिमित्त आलेल्या भाविकांनी रक्तदानही केले. तशी यंत्रणाही आयोजकांकडून करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या एक तासात ५५ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमानंतर आणखी वाढ झाली. सायंकाळपर्यंत १४७ जणांनी रक्तदान केल्याची माहिती मोहन थावरे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...