आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या सभेत वैफल्यातून लाठीहल्ला : भंडारींचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - बिहारमध्ये नरेंद्र मोदींच्या सभेत झालेला लाठीहल्ला हा जदयू सरकारच्या वैफल्यग्रस्ततेतून झालेला आहे. तशी आत्मघातकी चूक राज्यातील सरकार करणार नाही. या राज्याची संस्कृती वेगळी आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

नरेंद्र मोदी यांची 30 रोजी जाहीर सभा होत आहे. त्या सभेसंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माधव भंडारी बोलत होते. राज्यात मोदींच्या सभा सुरक्षित होतील. कारण या राज्याची संस्कृती वेगळी आहे, असेही भंडारी म्हणाले. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची न्यायालयीन चौकशी सुरू करणे हे सूडबुद्धीचे राजकारण आहे, असा आरोपही भंडारी यांनी केला. गावितांनी यापूर्वी आदिवासी विकास विभागात केलेल्या गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी भाजपने अनेकदा केली, परंतु सरकारने त्यावर काहीही हालचाल केली नाही. आता गावितांची मुलगी भाजपकडून निवडणुकीला उभी राहिल्याने चौकशी सुरू झाली. अशी दुटप्पी भूमिका पवारांनी केवळ भाजप नाही, तर इतरांसोबतही घेतली आहे, अशी टीका भंडारी यांनी केली.