आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Congress, BJP, Shiv Sena, Lok Sabha Election

‘मर जवान, मर किसान’ असा केंद्रातील कॉंग्रेस सरकारने नारा दिला - नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड,/अमरावती - नरेंद्र मोदी यांनी अमरावती येथे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यासाठी तर नांदेड येथे भाजपचे उमेदवार डी.बी.पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या. अमरावतीच्या सभेत शेतक-यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करून केंद्रातील यूपीए सरकार आणि पवारांवर जोरदार टीका केली. लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ असा नारा दिला होता. मात्र केंद्रातील काँग्रेस सरकारने ‘मर जवान, मर किसान’ असा नारा दिला आहे. देशाच्या सरहद्दीवर दहशतवादी हल्ल्यांमध्ये जेवढे सैनिक शहीद झाले त्यापेक्षाही जास्त शेतक-यांनी विदर्भात आत्महत्या केल्या आहेत, असे सांगून कृषिमंत्र्यांना क्रिकेट सामन्यांबाबत प्रतिक्रिया द्यायला वेळ आहे, मात्र शेतक-यांच्या समस्येवर बोलण्यासाठी वेळ नाही, असा टोला त्यांनी पवारांना लगावला.


गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘काँगे्रस चले जाव’
इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी चले जावचा नारा देण्यात आला होता, आता चले जावचा नारा देऊन काँग्रेसमुक्त भारत करणे आद्यकर्तव्य आहे, असे मोदी म्हणाले.


शहिदांच्या विधवांना लुटणा-यांवर कारवाई : मोदी
काँग्रेसचे सर्वच उमेदवार ‘आदर्श ’आहेत. घोटाळेबाज सरकारने देशाचे रक्षण करणा-या शहीद जवानांच्या विधवा पत्नींचे फ्लॅटही हिसकावून घेतले. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या विधवांना लुटणा-यांना सोडणार नाही, अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी रविवारी नांदेडात अशोक चव्हाणांवर टीका केली. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी गुरुगोविंदसिंग स्टेडियमवर मोदींची सभा झाली. त्या वेळी मोदींनी ‘आदर्श’च्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्ला चढवला. शहजादे दिल्लीत सांगतात भ्रष्टाचार से समझौता नहीं आणि आदर्शप्रकरणी कारवाई न करता त्यांना उमेदवारी देतात, हीच का ती कारवाई, असा सवाल केला. भाजप सत्तेवर आल्यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या लोकप्रतिनिधींवर विशेष न्यायालयात खटले चालवून एक वर्षाच्या आत शिक्षा दिली जाईल, असे मोदी म्हणाले.