आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत मोदींच्या दौर्‍याची शक्यता!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या 5 विभागांत जाहीर सभा घेणार असून उस्मानाबाद जिल्ह्यातही त्यांचा दौरा होऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र दौरा अद्याप निश्चित नसल्याचे म्हटले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणार्‍या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे समजते. जिल्हा प्रशासनाने या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, दौर्‍याची निश्चिती अद्याप कळवण्यात आलेली नाही. दरम्यान, राज्यात पुन्हा मोदी लाट निर्माण होण्यासाठी स्वत: मोदी पाच सभा घेणार असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. त्यासाठी पंतप्रधान मोदी 21 ऑगस्टपासून महाराष्ट्रात येणार आहेत. मात्र, या सभा कोणत्या भागात होणार आहेत, याचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.