आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nationalist Opponents Divided In Osamanabad, DIvya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पक्ष बदलाचे वारे: उस्मानाबादेत राष्ट्रवादीच्या विरोधकांमध्ये फाटाफूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - जिल्ह्यातील तीन नेत्यांनी रात्रीतून दुस-या पक्षांमध्ये जाऊन उमेदवारी मिळवली. त्यामुळे उस्मानाबादसह तुळजापूर विधानसभा निवडणुकीत रंगत आली आहे. तुळजापुरात प्रमुख राजकीय पक्षाचे पाच उमेदवार रिंगणात उतरल्याने पंचरंगी लढतीचे चित्र आहे, तर उस्मानाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विरोधक प्रथमच स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरले आहेत.

काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर भाजपच्या वाटेवर असल्याची शुक्रवारपासून जोरदार चर्चा होती. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांचा पक्षामध्ये प्रवेश झाला आणि भाजपकडून उस्मानाबाद मतदारसंघासाठी नाव जाहीर करण्यात आले. या प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शनिवारी दुपारी त्यांनी भाजपमधील पदािधका-यांसह समर्थक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उमदेवारी अर्ज दाखल केला.
तुळजापुरात शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांनी मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय गोटात चर्चेला उधाण आले आहे. रोचकरी यांनी यापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, काँग्रेस पक्षामध्ये राहून कार्य केले आहे. मात्र, ऐन विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा नेम चुकत होता. या वेळी ते भाजपच्या संपर्कात होते. मात्र, महायुतीच्या चर्चेच्या गुऱ्हाळामुळे तुळजापूरच्या जागेचा पेच अखेरच्या दोन दिवसांपर्यंत कायम राहिला. त्यामुळे त्यांनी मनसेमध्ये जाण्याचा मार्ग निवडला. मनसेने तुळजापूरमध्ये यापूर्वी अमरराजे परमेश्वर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने रोचकरी यांना संधी मिळाली आहे. उमरग्यामध्ये काँग्रेसच्या संपर्कात असलेले डॉ.संजय गायकवाड यांनी अचानक पक्ष बदलून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांना पक्षाने उमेदवारी दिली असून उमरगा, तुळजापूरसह उस्मानाबादेत पक्ष बदलाच्या लाटेत अनेक फेरबदल झाले आहेत. निवडणुकीला रंगत येण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.