आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: खरिपाचे पीक कर्ज रब्बीला तरी मिळेल का? अवघ्या 916 जणांना 10 हजारांचे वाटप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - सभासद शेतकऱ्यांना पीककर्जापोटी खरिपाच्या पेरणीसाठी प्रत्येकी १० हजार रुपयांची रक्कम आगाऊ देण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व बँकांना दिले हाेते. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता खरिपासाठीचे हे १० हजार रुपयांचे पीककर्ज तोंडावर आलेल्या रब्बी हंगामासाठी तरी पदरात पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण आतापर्यंत राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी केवळ ९११ शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजारांचे कर्ज दिले आहे.  
 
शेतकरी आंदोलनाच्या उठावानंतर अगोदर नाही-नाही म्हणणाऱ्या राज्य शासनाने अटी व शर्थी लादून अखेर कर्जमाफीला मान्यता दिली. त्यानुसार, मुख्यमंत्री, सहकार मंत्र्यांनी आकडे व कर्जाच्या रकमाही सांगितल्या. परंतु, घोषणेनंतर प्रत्यक्षात जाहीर होत असलेल्या निकषामुळे अजूनही शेतकरी आपण यामध्ये पात्र आहोत की नाही याबाबत संभ्रमावस्थेत आहे. त्यातच या किचकट प्रक्रियेला होणारा विलंब मान्य करत शासनाने सर्व खातेदार शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी १० हजार रुपयांची रक्कम पीककर्जापोटी तात्पुरती देण्याचे आदेश दिले. परंतु, खरीप हातचा जाऊन रब्बी हंगाम तोंडावर आला तरी सदरची रक्कम बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरात पडलेलीच नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांमधूनच  सदरची रक्कम रब्बीच्या हंगामात तरी मिळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. विशेष म्हणजे या सर्व उपाययोजनांच्या घोषणा होऊन तब्बल दीड महिना लोटला आहे. तरीही अद्याप पहिलेच १० हजारांचे कर्ज मिळत नाही.

३४ हजार शेतकऱ्यांचे अर्ज   
शासनाकडून कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर महिनाभर तर कोण पात्र आणि कोण अपात्र याबाबत संभ्रमावस्था कायम होती. त्यानंतर सीआयसी केंद्रातून सदरील अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. दि.१९ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ३४ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठीचे अर्ज सदरच्या सीआयसी केंद्रात दाखल केले आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...